
पाळीव प्राण्यांना सहसा राग येत नाही मात्र जर राग आला तर ते कोणाचीही भीड ठेवत नाहीत याचा प्रत्यय अनेकदा आपल्याला येत असतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत असून या व्हिडीओमध्ये एका खोडकर आजोबांना याचा चांगलाच अनुभव आला. अशाच एका व्हायरल व्हिडीओमध्ये आजोबांना न जाणे काय सुचलं आणि त्यांनी रस्त्यावर शांत उभा असलेल्या बैलाला काठीने मारलं मग काय ? बैलाने जे केलं ते पाहून तुमचा देखील थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही .
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अवघ्या २७ सेकंदांचा असला तरी त्यावर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील रेकॉर्डिंगमधील हा व्हिडीओ असून व्हिडीओच्या सुरुवातीला एक बैल रस्त्याच्या कडेला शांत उभा असल्याचं दिसत येत आहे. तेवढ्यात पांढरा धोतर-सदरा घातलेले एक आजोबा हातात काठी घेऊन तिथून जात असताना रस्त्याच्या कडेला शांतपणे उभा असलेल्या बैलाला काठीने मारतात. बैलालाही आजोबांच्या या कृतीचा राग येतो आणि आजोबांना आपल्या शिंगांनी या बैलाने हवेत उडवलं आणि आपटून दिल .
आपल्याशी पंगा घेणाऱ्या आजोबांना धडा शिकवून हा बैल पुढे जातो आणि आजोबा काही वेळ आहे त्याच ठिकाणी बसलेले दिसून येत आहेत. बैल थोडं पुढे गेल्यानंतर आजोबा सुद्धा आपल्या हातातल्या काठीच्या मदतीने उठतात आणि मग आपल्या मार्गाला जातात.व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने या घटनेला आजोबाच जबाबदार असल्याचं सांगितलं आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ५२ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.