
महाराष्ट्रात नागरिकांना कायद्याची भिती आहे की नाही असे अनेक प्रकार समोर येत असताना अशीच एक घटना बीड जिल्ह्यात वडवणी येथे उघडकीस आली आहे. वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार बीड तालुक्यातील चिंचाळा येथे 12 जानेवारी रोजी घडली आहे आणि या गोंधळात आरोपी देखील फरार झाला आहे.
सदर प्रकरणी चार जणांच्या विरोधात वडवणी पोलिस ठाण्यात शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. दत्ता मुन्ना राठोड ( राहणार चिंचाळा ) याचे गावाजवळ हॉटेल आहे. त्याच्याविरुद्ध वॉरंट असल्याने त्याच्या बजावणीसाठी वडवणी ठाण्याचे हवालदार अंशीराम कापले हे अन्य दोन सहकारी कर्मचाऱ्यांना घेऊन 12 जानेवारी रोजी हॉटेलवर गेले होते त्यावेळी दत्ता राठोड यांची मुले आणि पत्नी सुमन यांनी शिवीगाळ करत पोलिसांना धक्काबुक्की केली म्हणून त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.