
महाराष्ट्रात फसवेगिरीचे अनेक प्रकार उघडकीला येत असून अशीच एक घटना मुंबई येथे उघडकीला आली आहे. दहा महिन्यात दुप्पट रक्कम करून देण्याचे आमिष दाखवत एका शिक्षिकेला तब्बल 35 लाख रुपयांना चुना लावण्यात आलेला आहे. दुप्पट रक्कम देण्याच्या आमिषाने या शिक्षिकेने पैसे अडकवले मात्र कंपनीला टाळे ठोकून मालक फरार झाला सदर प्रकरणी माहीम पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून याच व्यक्तीने अनेक जणांची फसवणूक केल्याचा देखील संशय आहे.
माहीम परिसरात राहणाऱ्या सय्यद गुलशन आरा सय्यद ( वय 51) पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून सय्यद या खाजगी शिकवणी चालवतात. डिसेंबर 2020 मध्ये त्यांच्या ओळखीचे मोहम्मद अमीन शेख यांच्यामार्फत घाटकोपर येथील यश ट्रेड सेंटरचे मालक दत्तात्रेय गोविंद जाधव आणि सुहास शामराव तावडे यांच्याशी त्यांची ओळख झाली होती. त्यांनी त्यांना 10 महिन्यात दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर त्यांनी 2020 ते 2021 या दरम्यान 35 लाख रुपयांची गुंतवणूक त्यांच्याकडे केली.
सदर प्रकरणी काही कालावधी जाताच आपली फसवणूक होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी रक्कम परत करण्यासाठी तगादा सुरू केला त्यावेळी आज-उद्या करत काही काळ गेल्यानंतर एके दिवशी अचानक मालक कार्यालय बंद करून फरार झाल्याचे त्यांना समजले आणि त्यांनी पोलिसात गुन्हा नोंदवला . आरोपींनी अशाच पद्धतीने फसवणूक केली असल्याचा देखील पोलिसांना संशय असून पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.