शिवसेना कुणाची ? ‘ ह्या ‘ तारखेला सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी

शेअर करा

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन झालेली असली तरी शिवसेनेचे नक्की मालक कोण ? हा प्रश्न अद्यापही कोर्टात सुरू आहे. सोळा आमदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली असून 22 ऑगस्ट रोजी ही सुनावणी होणार आहे.सुरुवातीला ही सुनावणी 10 ऑगस्ट रोजी होणार होती त्यानंतर १२ ऑगस्ट ही नवीन तारीख आली.

‘ खरी शिवसेना आमचीच आहे ‘ असा दावा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुतांश आमदार आमच्या बाजूने असल्याने शिवसेना आमचीच आहे असा दावा केलेला आहे आणि याबाबत आता सर्वोच्च न्यायालयाकडून हा निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात पक्ष चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असे देखील आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत तर पुढील सुनावणी आता 22 ऑगस्टला होणार आहे.


शेअर करा