शेतकरी होऊन प्रेम करणे चूक का हो ?, उद्धवजी उत्तराची वाट पाहतोय

शेअर करा

महाराष्ट्रात आणि वेगवेगळ्या घटना उघडकीला येत असताना अशीच एक घटना हिंगोली येथे उघडकीला आली असून प्रेमभंग झालेल्या एका शेतकरी युवकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या संदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे. शेतकरी होऊन प्रेम करणे चूक का हो ? असा प्रश्न या शेतकऱ्याने विचारलेला असून सदर पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे.

संबंधित प्रेमवीराने या पत्रातून आपले मन मोकळे केले असून शेतकरी होऊन प्रेम करणे चुकीचे असते का ? खरंतर तुम्हाला भेटून खूप रडावस वाटत आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात प्रेमात आत्महत्या करावी लागत असेल तर मी या प्रेमाचा धिक्कार करतो आणि माझ्या प्रश्नाचे आपण उत्तर द्याल , अशी वाट पाहतो अन्यथा जगातुन निघून जाणे या व्यतिरिक्त माझ्याकडे पर्याय नाही. उत्तर कधी देता साहेब वाट पाहतोय, . असे देखील त्याने म्हटले आहे.


शेअर करा