
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून कायदा हातात घेण्याचे प्रमाण वाढलेले असून अशीच एक घटना सोलापूर येथे समोर आलेली आहे. ‘ तू आमच्या विरोधात गेला तर तुझे तलवारीने तुकडे तुकडे करील आणि फेकून देईल ‘ अशी धमकी भाजपच्या एका नगरसेवकाने एका व्यक्तीला दिली असून त्याच्या विरोधात जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भाजपचा नगरसेवक असलेला सुनील कामाठी असे त्याचे नाव असून त्यांच्यासह इतर सात जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
9 एप्रिल रोजी रात्री अकराच्या सुमारास आकाश चव्हाण, नगरसेवक सुनील कामाठी , गणेश कामाठी , शिवा कामाठी , महेश पवार, मनोज बनसोडे ( सर्वजण राहणार सोलापूर ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
संजय काशिनाथ आडगळे ( वय 39 राहणार भगवान नगर पोलीस मुख्यालय शेजारी सोलापूर ) हे राम जाधव यांच्या वाढदिवसासाठी सूर्या हॉटेल पाठीमागे असलेल्या कांचन गॅरेजमध्ये गेलेले असताना तिथे सर्व जण आले आणि शुभेच्छा दिल्या. त्यानंतर संजय आडगळे यांच्याजवळ एकाने येत ‘ आमच्या पप्पाला सोडून दुसऱ्या पार्टी तू गेलास आता तुला सोडत नाही तुझा गेमच करतो ‘ असे म्हणत धमकी दिली आणि त्यांना बाहेर बोलावले .
संजय आडगळे त्यांची नजर चुकवून घरी निघाले तेव्हा दोन अनोळखी नंबर वरून संजय आडगळे यांना फोन आला आणि तुला आज सोडणार नाही अशी धमकी दिली त्यानंतर आडगळे यांनी मी आता घरी आलो आहे मला फोन करू नका असे सांगितले. त्यानंतर भगवाननगर जवळ संजय आडगळे हे मित्र संदीप वाडेकर यांच्यासोबत बोलत बसलेले असताना काहीवेळाने ते जवळ असलेल्या रिक्षात बसले तेव्हा सर्वजण तेथे आले आणि त्यांनी संज्या तू कुठे लपून बसला आहेस असे ओरडू लागले.
आकाश चव्हाण याने संजय आडगळे यांना रिक्षात बसलेले पाहिले आणि त्यांना ओढून काढत तिथे पडलेल्या विटांनी त्यांना मारहाण केली आणि नगरसेवक सुनील कामाठी याने लाकडाने मारहाण केली. सुनील कामाठी याने हातात तलवार घेऊन ‘ जर आमच्या विरोधात गेला तर तुकडे तुकडे करीन ‘ अशी धमकी दिली त्यानंतर संजय आडगळे यांनी पोलिसात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली.