संतप्त वानरे कुत्र्यांची पिल्ले उंचावर नेऊन देत आहेत सोडून , काय आहे कारण ?

शेअर करा

महाराष्ट्रात बीड इथे एक वेगळीच घटना समोर आली असून गावातील वानरांचा धुमाकूळ हा परिसरात चर्चेचा विषय झाला असून कुत्र्यांपाठोपाठ आता नागरिक देखील या वानरांचा उपद्रव सहन करत आहेत. बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यात लवुळ गावातील हा प्रकार असून गावातील माकडांनी चक्क कुत्र्यांची पिल्ले मारून टाकण्याचा प्रकार सुरु केला असून आतापर्यंत तब्बल २५० कुत्र्यांच्या पिल्लांनी आपला जीव गमावला आहे . ही माकडे कुत्र्यांच्या पिल्लाना उचलून उंचावर घेऊन जात खाली टाकून देत आहेत तर वनविभागाकडून देखील अद्याप कोणत्याच उपाययोज़ना केल्या जात नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे .

उपलब्ध माहितीनुसार, माजलगावपासून दहा किमी अंतरावर लवुळ नावाचं गाव आहे. गावातील काही कुत्र्यांनी एका माकडाच्या पिल्लावर हल्ला करून त्याचा जीव घेतला होता तेव्हापासून माकडं सूड भावनेनं पेटली असून बदला घेण्यासाठी त्यांनी गावातील 250 कुत्र्यांची पिल्लं मारली आहेत. वन विभागाशी संपर्क साधला असता कर्मचाऱ्यांनी गावात येऊन संबंधित वानरास पकडण्याचा प्रयत्न केला पण ही वानरे काही वनविभागाच्या हाती न लागल्याने हताश कर्मचारी गावातून निघून गेले ते पुन्हा आलेच नाहीत आणि आता चक्क ही माकडे लहान मुलांना देखील टार्गेट करत आहेत.

लवुळ गावात हा प्रकार गेल्या एक महिन्यांपासून सुरु असून ही माकडं गावात कुत्र्याचं पिल्लू दिसलं की त्याला उचलून उंच झाडावर किंवा घराच्या छतावर घेऊन जात त्यांना खाली टाकून देतात त्यामुळे कुत्र्यांच्या पिल्लांचा जागीच मृत्यू होत आहे. गेल्या महिनाभरात गावातील जवळपास 250 कुत्र्यांच्या पिल्लांचा जीव घेतला असून माकडांच्या या धक्कादायक कृत्यामुळे गावकरी दहशतीत जगत असून ही माकडं आता गावातील लहान लेकरांना देखील टार्गेट करत आहेत . वनविभाग आता काय लहान मुलांचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का ? असा संतप्त सवाल नागरिक आता विचारत आहेत.


शेअर करा