सपना चौधरीवर गुन्हा दाखल , तिची वहिनी म्हणतेय की.

शेअर करा

गेल्या काही वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीत दाखल झालेली हरियाणा येथील स्टेज डान्सर सपना चौधरी हिच्याविरोधात एक गंभीर गुन्हा दाखल झालेला असून चंडीगड येथील हे प्रकरण आहे. हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी तिच्या विरोधात पलवल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सपना हिचा भाऊ करण आणि आई नीलम हे देखील या प्रकरणात आरोपी आहेत.

सपना आणि तिचा भाऊ करण आणि आई मिलन यांनी हुंड्यामध्ये महागडी गाडी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप असल्याचा दावा सपना हिची वहिनी यांनी केलेला आहे. पोलिसांनी पलवल पोलीस ठाण्यात त्यांची चौकशी केली असून प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केलेली आहे

सपना हिच्या वहिनीच्या म्हणण्यानुसार तिचे लग्न दिल्ली येथील राहत असलेला सपना हिचा भाऊ नजफगड येथील करण याच्यासोबत 2018 मध्ये झाले होते. लग्न झाल्यापासूनच तिचा हुंड्यासाठी छळ केला जात होता याच दरम्यान तिला अनेकदा मारहाण देखील करण्यात आली आणि करण याने अनेकदा तिच्यावर अनैसर्गिक पद्धतीने तिचे लैंगिक शोषण केले. सपना चौधरी आणि तिच्या कुटुंबीयांच्या विरोधात पोलिसांनी त्यानंतर अदखलपात्र गुन्हा नोंदवलेला असून तपास सुरू आहे.


शेअर करा