सर तुम्हीसुद्धा ? पुण्यातील धायरीत घडला खळबळजनक प्रकार

शेअर करा

महाराष्ट्रात शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात एक खळबळजनक घटना धायरी परिसरात उघडकीला आली असून खाजगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकाने एका तरुणीला त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले मात्र तिने नकार दिल्यानंतर त्याने तिच्या सोबतचे आपले फोटो व्हायरल करण्याची तिला धमकी दिली तसेच त्यानंतर तिचे लग्न जमले असताना तिच्या पतीला देखील ठार करून टाकेल अशी देखील धमकी दिली असे प्रकरण समोर आले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , नितेश सुडके उर्फ हर्षवर्धन लक्ष्मण पाटील ( वय 28 राहणार हिंगणे सिंहगड रस्ता पुणे ) असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात एकवीस वर्षीय तरुणीने सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. फिर्यादी तरुणीच्या म्हणण्यानुसार जून २०२२ पासून आरोपी हा आपल्याला सातत्याने ब्लॅकमेल करत धमकी देत होता.

पीडित तरुणीने आरोपी शिकवत असलेल्या खाजगी क्लासमध्ये गणिताचा क्लास लावला होता. दरम्यानच्या काळात आरोपी शिक्षक आणि तरुणी यांच्यात 2020 मध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि त्यानंतर आरोपीने तिला दमदाटी करत तिच्यासोबत स्वतःचे काही फोटो काढले. दरम्यानच्या काळात तरुणीचे दुसरीकडे लग्न जमले आणि तिने आरोपी याला आपल्यासोबत संबंध न ठेवण्याचे सांगितले मात्र तो काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.

आरोपी तिचा पाठलाग सातत्याने करत असायचा तसेच त्याने तिला भेटून तिच्यासोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची तिला धमकी दिली तसेच तिचा हात पकडून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशा स्वरूपाचे देखील वर्तन केले. ज्या मुलासोबत फिर्यादी मुलीचे लग्न जमलेले आहे त्यालादेखील आरोपीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सदर प्रकरणी पोलीस तपास सुरू असल्याचे समजते.


शेअर करा