
महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार कल्याणजवळ डोंबिवली येथे उघडकीला आलेला असून आपण पोलीस आहोत याची बतावणी करत एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार ठाकुर्ली खाडी किनारा परिसरात शुक्रवारी उघडतील आलेला आहे. अल्पवयीन विद्यार्थिनी ही तिच्या मित्रासोबत खाडीकिनारी परिसरात फिरण्यास गेलेली होती त्यावेळी दोन आरोपी तिथे पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी आपण पोलीस असल्याची बतावणी केली.
पीडित असलेली विद्यार्थिनी ही तिच्या एका मित्रासोबत संध्याकाळी चारच्या सुमारास शुक्रवारी फिरण्यास गेलेली होती त्यावेळी तिथे दोन जण आले आणि त्यांनी ‘ आम्ही पोलीस आहोत तुम्ही इथे काय करताय ? ‘ असे करत त्यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. सदर प्रकार तुमच्या दोघांच्याही पालकांच्या कानावर आम्ही घालू अशी देखील त्यांनी धमकी दिली त्यानंतर थोड्या अंतरावर आमचे साहेब उभे आहेत तिकडे चला असे करून दोघांनाही तिकडे घेऊन जाण्यात आले.
त्यानंतर एकाने या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केला त्यानंतर आरोपी मुलीच्या मित्राला इतरत्र एकजण घेऊन गेला त्यावेळी दुसऱ्या व्यक्तीने देखील तिच्यावर अत्याचार केला. पीडित विद्यार्थीनी इयत्ता बारावीत शिकत असून भरदिवसा हा प्रकार घडल्याने विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.