साक्षीनं एमबीबीएस ऍडमिशनपर्यंत मजल मारली पण..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना लातूर येथे उघडकीला आलेली असून लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस शिकत असलेल्या प्रथम वर्षीय 21 वर्षीय विद्यार्थिनीने वस्तीगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. गांधी चौक पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, साक्षी राजेंद्र गायकवाड ( वय 21 ) असे मयत विद्यार्थिनीचे नाव असून ती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रथम वर्षात शिकत होती. महाविद्यालय परिसरात असलेल्या वसतीगृहात मंगळवारी सकाळी तिने वसतीग्रहाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.आतून दरवाजा बंद असल्याने मैत्रिणींनी दरवाजा वाजवला मात्र प्रतिसाद आला नाही म्हणून सुरक्षारक्षकाला याप्रकरणी खबर देण्यात आली वस्तीगृहातील कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडून आत पाहिले तर साक्षीने गळफास घेतलेला होता.

गांधी चौक पोलीस ठाण्यात याप्रकरणी खबर देण्यात आल्यानंतर अवघ्या काही मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एम कोल्हे, उमाकांत पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलेला असून साक्षी हिने हे टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती अद्यापपर्यंत आलेली नाही .


शेअर करा