‘ साहेब लवकर या माझी बायको आता.. ‘, पोलीस पथक पोहचले तेव्हा चक्क..

शेअर करा

नागरिकांना मदतीसाठी म्हणून पोलिसांनी 112 आणि १०० हे नंबर जारी केलेले आहेत मात्र अनेकदा या नंबरचा गैरवापर करत असल्याचे देखील प्रकार समोर आले असून अशीच एक घटना बीड येथे उघडकीला आलेले आहे.

एका व्यक्तीने ‘ माझी पत्नी घरातून निघून गेलेली आहे ती आता काही वेळात आत्महत्या करणार आहे साहेब तुम्ही लवकर मदत पाठवा ‘ असे चार ते पाच कॉल 112 नंबर वर केलेले होते. पोलिसांनी तिथे तात्काळ धाव घेतली असता दोघेही पती-पत्नी एकाच घरात आढळून आले त्यामुळे पोलिसांनी खोटा कॉल करणाऱ्या या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. धारूर जवळ असलेल्या भोगलवाडी येथे ही घटना घडली.

नवनाथ विठ्ठल तिडके असे आरोपीचे नाव असून 30 जून रोजी तो दारूच्या नशेत घरी गेला होता त्यावेळी त्याचा त्याच्या पत्नीसोबत वाद झाला त्याने त्याच्या पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलून घेईन अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने 112 नंबर वर फोन करून पोलिसांची देखील दिशाभूल केली आणि चार ते पाच वेळा कॉल करून आपली पत्नी रुसून गेलेली आहे ती आत्महत्या करेल असे सांगितले.

त्याच्या आलेल्या फोननंतर पोलिस यंत्रणा देखील सक्रिय झाली आणि अवघ्या काही मिनिटांच्या आत पोलीस त्याच्या घरी पोलीस पोहोचले त्यावेळी दोघेही पती-पत्नी एकाच घरात बसून त्यांच्यात भांडण सुरू होते. पोलिसांनी चौकशी केली त्यावेळी त्याने दारुच्या नशेत आपण फोन केलेला होता असे सांगितल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


शेअर करा