सीबीआयला दिलेली ‘ ती ‘ परवानगी तेलंगणा सरकारने घेतली मागे

शेअर करा

महाराष्ट्र सरकारने शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर सीबीआयला सर्वसाधारण चौकशीसाठी परवानगी दिली होती तर दुसरीकडे तेलंगणा सरकारने मात्र सीबीआयला दिलेली सर्वसाधारण परवानगी मागे घेतली असून सीबीआय चौकशीसाठी परवानगी नाकारणारे राज्य म्हणून तेलंगणाचा समावेश झालेला आहे. 30 ऑगस्ट रोजी राज्य सरकारने या संदर्भात आदेश काढले असून तेलंगाना इथे तपासासाठी आता राज्याची परवानगी आवश्यक आहे. सीबीआय केंद्र सरकारच्या विरोधकांना लक्ष करत असल्याने ही परवानगी तेलंगाना सरकारने मागे घेतली आहे अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

तेलंगणातील सरकार पाडण्याच्या उद्देशाने आमदारांना आमिष दाखविण्याचा प्रकार चर्चेत आला होता सदर प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी भाजपच्या आमदारांनी केली असून त्यानंतर राज्य सरकारने तेलंगणात सीबीआयला तपासासाठी पुढील प्रकरणात राज्याची परवानगी घेणे आवश्यक आहे असे आदेश काढले आहेत. सीबीआय आणि ईडी यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विरोधकांना निशाण्यावर घेण्यात येते असे आरोप या आधी देखील अनेकदा झालेले आहेत त्या पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारचा हा निर्णय महत्त्वाचा आहे.


शेअर करा