
नवीन संसाराचे स्वप्न घेऊन सासरी पाऊल ठेवलेल्या विवाहितेला जाच करण्यात आल्याच्या घटना महाराष्ट्राला नवीन नाहीत अशीच एक धक्कादायक घटना भिवंडी येथे उघडकीला आली असून हुंडा म्हणून मोटारसायकल आणि सोन्याची चैन आणण्यासाठी विवाहितेकडे सतत तगादा लावून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला म्हणून अखेर तिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. भिवंडी शहरातील विठ्ठल नगर येथे शुक्रवारी ही घटना घडलेली असून विवाहितेच्या आईने सासरच्या मंडळींच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.
नूर जहान बानू इर्शाद अन्सारी ( वय एकवीस ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव वाचून तिचे विठ्ठल नगर येथील रहिवासी असलेला इर्शाद अन्सारी याच्यासोबत 21 मे 2021 रोजी निकाह झालेला होता. कुटुंबीय यांनी रीतिरिवाजानुसार सर्व काही दिलेले असताना मोटारसायकल आणि सोन्याची चैन यासाठी पती इर्शाद अन्सारी, सासू अंवरी बेगम, नणंद मुस्कान अन्सारी यांनी विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली त्यानंतर सातत्याने होत असलेल्या या जाचाला कंटाळून नूर जहान बानू यांनी घरातील विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.
नूरजहान बानू यांची आई शहाजहान शौकत अली अन्सारी यांनी आपल्या विवाहित मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून पती सासू नणंद यांच्या विरोधात नारपोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.