सैराट जोडप्यांसाठी ‘ फुल्ल संरक्षण ‘ देणाऱ्या भारतातील एका गावाची गोष्ट

शेअर करा

घरच्यांची जर कधी लग्नाला संमती नसेल तर बहुतांश जोडपी पळून जाऊन लग्न करतात. महाराष्ट्रात साधारण आळंदी परिसरात जाऊन ही लग्न उरकली जातात मात्र पळून जाऊन लग्न करणाऱ्यांना राहण्यासाठी भारतातील एक जागा प्रसिद्ध असून या जागेत जर एखाद्या प्रेमी युगुलानं आसरा घेतला, तर त्याच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी त्या गावाकडून घेतली जाते . पळून लग्न करणाऱ्यांसाठी ही जागा एक सुरक्षित ठिकाण आहे.

हिमाचल प्रदेशात कुल्लू जिल्ह्यातील शंगचूल असे या गावाचे नाव असून येथील महादेव मंदिरात जर एखाद्या जोडप्याने आसरा घेतला तर त्याच्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी गावाकडून घेण्यात येते. अगदी पोलिसांना देखील इथे येण्यास मनाई आहे तर कुणालाही कुठलंही शस्त्र घेऊन गावात प्रवेश करू दिला जात नाही. या गावात राहणाऱ्या प्रेमी युगुलाच्या केसांनाही धक्का लागू नये याची काळजी ग्रामस्थ घेतात तर त्यांना याच मंदिर परिसरात हवा तितका काळ राहण्याची देखील मुभा आहे .

प्रेमी युगुलांना संरक्षण देण्याच्या प्रथेमागे गावकऱ्यांची एक श्रद्धा आहे त्यानुसार महाभारतातील युद्धाच्या आधी या भागात पांडव आले होते मात्र त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी कौरव देखील इथे आहे तेव्हा पांडव इथल्या महादेवाच्या मंदिरात लपून बसले होते आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी स्वतः महादेव पुढे आले आणि या मंदिरातील प्रत्येकाच्या संरक्षणाची जबाबदारी आपली असल्याचं कौरवांना सांगितलं. त्यामुळे कौरवांना निराश होऊ परतावं लागलं आणि पांडवांचं संरक्षण झालं.या आख्यायिकेमुळेच गावात येणाऱ्या प्रेमी युगुलाला संरक्षण देण्याची भूमिका गावकऱ्य़ांनी घेतली आहे आणि वर्षानुवर्षे ती पाळली जात आहे.


शेअर करा