‘ सोन्याच्या विटा ‘ साठी शेतकऱ्यानं जमीन विकली मात्र त्यानंतर जे घडलं

शेअर करा

फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार लातूर इथे समोर आलेला असून तुम्हाला कमीत कमी दोन किलो सोन्याच्या विटा देतो असे आमिष एका शेतकऱ्याला दाखवण्यात आले आणि त्या बदल्यात फक्त 40 लाख रुपये तुम्ही मला द्या अशी शेतकऱ्याकडे मागणी करण्यात आली त्यानंतर शेतकऱ्याने स्वतःचे शेत विकले आणि समोरील व्यक्तीला ही रक्कम दिली मात्र त्यानंतर त्यांना हातात पितळाच्या विटा मिळालेल्या आहेत . शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, निलंगा तालुक्यातील ताजपुर येथील शेतकरी असलेले संभाजी शिवाजीराव सोमवंशी ( वय 42 ) यांना दोन वर्षांपूर्वी त्यांचे नातेवाईक विश्वनाथ ज्ञानोबा सोमवंशी यांनी दोन किलो सोन्याच्या विटा माझ्याकडे आहेत तुम्हाला हव्या आहेत का ? असे विचारणा केली होती. कमी किमतीत या विटा तुम्हाला देऊ असे सांगत आरोपींनी त्यांना चाळीस लाख रुपयांची मागणी केली . विश्वनाथ याच्यासोबत त्याचा मित्र रमेश पांडुरंग चव्हाण ( राहणार अक्कलकोट सोलापूर ) आणि संजय मटारच स्वामी ( राहणार तालुका नेवासा जिल्हा नगर ) यांनी देखील या शेतकऱ्यांची भेट घेतली.

दोन किलो सोन्याच्या विटा तुम्हाला देऊ असे शेतकऱ्याला सांगण्यात आले मात्र त्यासाठी चाळीस लाख रुपये कुठून आणायचे हा शेतकऱ्यापुढे प्रश्न होता त्यामुळे अखेर त्यांनी अडीच एकर जमीन विकली आणि 40 लाख रुपये रक्कम वेगवेगळ्या माध्यमातून आरोपींना दिली त्यानंतर त्यांना सोन्याच्या सांगून विटा देण्यात आल्या मात्र या विटा सोन्याच्या नसून पितळाच्या असल्याचे समोर आले . शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे


शेअर करा