सोशल मीडियाने लाखो लोकांचा बळी जाणार , कोणी केलाय दावा ?

शेअर करा

सोशल मीडियाचा समाजावर मोठा परिणाम होत असून सामाजिक स्वास्थ खराब करण्यात देखील फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम यूट्यूब अशा समाज माध्यमांचा मोठा सहभाग दिसून येत आहे . मेटा कंपनीची मालमत्ता असलेल्या फेसबुकवर देखील अनेकदा एकतर्फी तसेच सामाजिक स्वास्थ खराब करण्याचे आरोप लागत असतात . मेटा कंपनीच्या माजी कर्मचारी फ्रान्सेस होगन यांनी सोशल मीडियाबद्दल गंभीर इशारा दिलेला असून जर सोशल मीडिया सुधारले नाही तर येत्या काळात लाखो लोकांचा यामध्ये बळी जाऊ शकतो असे म्हटलेले आहे . फ्रान्सेस यांनी फेसबुकमध्ये काही काळ काम केले होते त्यानंतर त्यांनी फेसबुक कंपनी सोडल्यानंतर फेसबुक फाइल्स नावाचे एक डॉक्युमेंट लीक केलेले होते.

सदर रिपोर्टमध्ये फेसबुकचा रिसर्च रिपोर्ट आणि कर्मचाऱ्यांमध्ये झालेली चर्चा देण्यात आलेली असून किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर इंस्टाग्रामचा काय परिणाम होतो याकडे मेटा अगदी कमी लक्ष देत आहे. भारतात धार्मिक तेढ वाढण्यासाठी देखील फेसबुकने मोठी भूमिका बजावलेली आहे असे देखील त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलेले आहे.

फ्रान्सेस पुढे म्हणतात की पारदर्शकतेच्या अभावामुळे सोशल मीडिया आज देखील धोकादायक झालेले असून फेसबुक आणि इंस्टाग्रामबद्दल बाहेर येणारी माहिती आणि सत्य माहिती यामध्ये भरपूर फरक आहे मात्र त्यामुळे मेटा कंपनीचा आर्थिक फायदा होत आहे त्यामुळे या गोष्टीकडे कंपनी लक्ष देत नाही असे देखील त्यांनी पुढे म्हटले आहे. सोशल मीडियामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे असे न झाल्यास येत्या वीस वर्षांमध्ये लाखो नागरिकांचा मृत्यू होऊ शकतो असा देखील दावा त्यांनी केलेला आहे.

फेसबुकवर अल्गोरिथम प्रमाणे आपल्याला आपल्या टाईम लाईनवर बातम्या तसेच पोस्ट दिसत असतात सोबतच अनेकदा अशा काही बातम्या ज्याच्याशी आपला काहीही संदर्भ नाही अशा देखील बातम्या समोर येतात मात्र अनेक वेळा त्यामुळे दुसरी बाजू समोरच येत नाही त्यामुळे एकतर्फी एकांगी विचार निर्माण होतात. केवळ फेसबुकच नव्हे तर युट्युब ट्विटर इंस्टाग्राम यांच्या बिझनेसचे मॉडेल हेच मुळात नागरिकांना आपल्यात खिळवून ठेवणे असल्याने नागरिकांना हव्या त्या आवडत्या पोस्ट दाखवणे या पद्धतीने हा प्रकार सुरू आहे मात्र त्यातून एकतर्फी एकांगी विचारसरणी निर्माण होते आणि धार्मिक तेढ वाढते असे देखील आतापर्यंत भारत , म्यानमार, अमेरिका अशा देशांमध्ये आढळून आलेले आहे.


शेअर करा