हनी सिंगला देण्यात आलेल्या ‘ असल्या ‘ ट्रीटमेंटची महाराष्ट्रात जोरदार चर्चा

शेअर करा

रंगबिरंगी लाईटमध्ये नाचत गाणे म्हणणारा हनी सिंग याला नागपूर कोतवाली पोलिसांनी दहा बाय दहाच्या खोलीत आवाजाचा सॅम्पल घेण्याच्या नावाखाली अनेक तास बसवून ठेवले आणि त्याला आवाजाचा सॅम्पल घेण्याच्या उद्देशाने गाणीदेखील म्हणायला लावली. याच दरम्यान अनेक वेळा रिटेक देखील करायला लावले. अश्लील स्वरूपाची गाणी गाऊन लोकप्रियता मिळवणाऱ्या हनी सिंग याला महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आलेल्या ट्रीटमेंटची महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चा आहे.

अश्लील शब्द असलेली असलेली गाणी गाऊन ती युट्युब वर अपलोड केल्यामुळे हनी सिंग सध्या कायदेशीर प्रक्रियेत अडकलेला आहे. त्याच्याविरुद्ध नागपूर येथील स्थानिक व्यवसायिक आनंद पाल सिंग जबल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती त्यानुसार न्यायालयाने ही याचिका मंजूर करून हनीसिंग याच्या विरोधात या एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले होते. 26 एप्रिल 2014 रोजी विचार भा द वि कलम 292 293 आणि माहिती अधिकार कायद्याच्या कलम 67, 67 अ प्रमाणे त्याच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आलेला आहे.

सत्र न्यायालयाने 27 ऑक्टोबर 2015 ला हनी सिंगला अटक पूर्व जामीन सशर्त परवानगी नुसार मंजूर केला होता मात्र न्यायालयाने त्याला हजर राहण्याचे आदेश दिले होते त्यानंतर त्याने न्यायालयात धाव घेत आदेशात बदल करण्याची मागणी केली होती मात्र ती न्यायालयाने फेटाळून लावली.

त्यानंतर 12 फेब्रुवारी रोजी हनी सिंग हा नागपूर येथे दाखल झाला मात्र तोपर्यंत उशीर झालेला असल्याने त्याला नागपूर येथे मुक्काम करावा लागला आणि रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तो पाचपावली पोलीस ठाण्यात पोहोचला तिथे पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर सुमारे तीन तास पोलिसांनी त्याला आवाजाचा सॅम्पल घेण्यासाठी रिटेक करायला लावले अन साडेचारच्या सुमारास त्याला मोकळे करण्यात आले.


शेअर करा