हृदयस्पर्शी.. म्हणून ‘ ते ‘ हरीण सारखं तिथे घुटमळत होत

शेअर करा

महाराष्ट्रात एक हृदयद्रावक घटना उघडकीला आली असून एका नागरिकाने अपघाताने सापडलेले एक हरणाचे पिल्लू आपल्या घरी आणले होते आणि त्यानंतर त्या नागरिकाचा अपघातात मृत्यू झाला. अत्यंत प्रेमाने अशा पाळलेल्या त्या हरणाने अक्षरश: तो व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याचा मृतदेह जिथे जाळला तिथे ते अनेक काळ ते घुटमळले आणि त्यानंतर त्या ठिकाणी ठेवलेला घास शिवून त्याने आपले प्रेम सिद्ध केले.

सोलापूर जिल्ह्यातील ही घटना असून कवठाळी येथील यशोदीप देविदास माने ( वय 20 ) याचा ट्रॅक्टर अपघात शुक्रवारी मृत्यू झाला. यशोदीप हा ट्रॅक्टरमध्ये कडबा घेऊन बार्शीला जात होता आणि बार्शीला कडबा उतरवून तो परत गावी येत असताना ट्रॅक्टर उलटून दुर्दैवाने यशोदीप याला त्यात प्राण गमवावा लागला.

यशोदीप यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीय आणि संपूर्ण गाव शोककळेत बुडाले त्यानंतर यशोदीप याला ॲम्बुलन्समध्ये घेऊन जात असताना देखील हरीण ऍम्ब्युलन्सच्या पाठीमागे धावले त्यानंतर ज्यावेळी यशोदीप याला अग्नी दिला त्यावेळी ते लांबून पहात होते. यशोदीप याला जिथे अग्नी दिला तिथे कुटुंबातील लोक नैवद्य ठेवून पाया पडून कावळ्याची वाट पाहत होते मात्र त्यानंतर कावळा आला खरा पण नैवेद्याला हरणाने स्पर्श केला.

यशोदीप हा कुटुंबासह शेतात राहत असताना त्याला हरणाचे पाडस सापडले होते. त्याने त्याला घरी आणून अक्षरश: गाईचे दूध बाटलीने पाजून मुलाप्रमाणे जपले होते त्यानंतर यशोदीप आणि त्यांची घट्ट मैत्री झाली होती त्यांच्या या अनोख्या मैत्रीची परिसरात जोरदार चर्चा आहे.


शेअर करा