‘ हॅलो मिस्टर उद्या संध्याकाळपर्यंत पाच लाख नाहीतर काहीच.. ‘,

शेअर करा

एक खळबळजनक घटना मुंबई इथे उघडकीला आलेली असून एका ज्वेलर्सच्या दुकानदाराला तब्बल पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जर खंडणीची रक्कम दिली नाही तर कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे देखील तक्रारदाराने सांगितले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, प्रदीप जेठाणी ( वय 60 ) असे तक्रारदार यांचे नाव असून वांद्रे पश्चिम येथे त्यांचे एक ज्वेलरी शॉप आहे. त्यांना आरोपीने दुकानाच्या लँडलाईन फोनवर फोन करून ‘ हॅलो मिस्टर उद्या संध्याकाळपर्यंत पाच लाख रुपयांची व्यवस्था करा .. जर असे केले नाही तर त्याचा त्रास तुमच्या कुटुंबियांना होईल आणि त्याला फक्त जबाबदार तुम्हीच. पश्चाताप करण्याशिवाय तुमच्याकडे काही हातात राहणार नाही ‘ अशी धमकी दिली आहे. धमकी आल्यानंतर तक्रारदार यांनी तात्काळ वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि संबंधित कॉलबद्दल तक्रार दिली. सदर प्रकरणी पोलीस तपास सुरू असल्याचे समजते.


शेअर करा