अंगात स्वामी अन साईबाबा आल्यासारखं करायचे , नवरा बायकोचीही करायचे ताटातूट

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असा फसवणुकीचा प्रकार कोल्हापुर इथे समोर आलेला असून स्वामी समर्थ आणि साईबाबा यांचा आपल्या अंगात साक्षात संचार होतो असे भासवत असहाय दांपत्यांना दैवी प्रकोपाची भीती दाखवून त्यांना एकमेकापासून वेगळे राहण्यास प्रवृत्त करणाऱ्या आणि कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या मंगळवार पेठेतील एका भोंदू टोळीला पोलिसांनी जेरबंद केलेले आहे त्यात एका महिलेचा देखील समावेश आहे.

उपलब्ध माहितीनुसार , प्रवीण विजय फडणीस ( वय 38 राहणार मंगळवार पेठ ) , श्रीधर नारायण सहस्रबुद्धे ( वय 55 सासणे बिल्डिंग फुलेवाडी ), सविता अनिल अष्टेकर ( वय ३५ राहणार मंगळवार पेठ ) अशी याप्रकरणी आरोपींची नावे असून त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेले आहे.

प्रवीण फडणीस हा आपल्या अंगात स्वामी समर्थ येतात तर श्रीधर सहस्त्रबुद्धे याने आपल्या अंगात साईबाबा येतात अशी आवई उठवत सर्वसामान्य नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढलेले होते त्यासाठी त्यांनी मठ देखील सुरू केलेला होता. ओम श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट या कार्यालयावर शुक्रवारी पहाटे छापा टाकण्यात आला त्यावेळी ‘ मी म्हणजे देव ‘ अशी बतावणी करत या टोळक्याने आतापर्यंत चार कोटी रुपयांना गंडा घातल्याचे समोर आलेले आहे.

सदर टोळक्याने दिलेल्या सल्ल्यात चक्क अनेक दांपत्यांना रात्रीच्या सुमारास अलिप्त झोपण्यास सांगितले त्यानंतर कौटुंबिक बाबतीत देखील ढवळाढवळ करत अजब सल्ले देणे त्यामुळे अनेक दांपत्यात आहेत त्यापेक्षा अधिक भांडणे निर्माण झालेली आहेत. सदर टोळीपासून आपली काही फसवणूक झालेली असेल तर नागरिकांनी राजवाडा पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन प्रमोद जाधव यांनी केलेले आहे.


शेअर करा