अखेर ‘ ते ‘ प्रेमीयुगुल लातूरच्या वीटभट्टीवर सापडलं , पोलीस पोहचले तेव्हा..

शेअर करा

एका अल्पवयीन प्रेयसीला पळवून तिच्यासोबत लग्न करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडलेले असून वर्षभरापूर्वी पळून गेलेल्या या जोडप्याला छत्रपती संभाजीनगर येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने ताब्यात घेतलेली आहे . लातूर जिल्ह्यातील एका वीटभट्टीवर हे दोघे काम करत होते.

उपलब्ध माहितीनुसार, आकाश आनंदा कांबळे ( वय 23 वर्ष राहणार चिखलभूशी तालुका कंधार जिल्हा नांदेड ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याची छत्रपती संभाजीनगर येथील बेगमपुरा परिसरात राहणाऱ्या एका सोळा वर्षांच्या मुलीसोबत ओळख झालेली होती. एकमेकांना मोबाईल नंबर शेअर केल्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले.

मुलीच्या घरच्यांना या प्रकाराची कल्पना आल्यानंतर त्यांनी विरोध सुरू केला मात्र त्यांच्या विरोधाला न जुमानता आकाश याच्यासोबत या अल्पवयीन मुलीने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पलायन केलेले होते. पीडित महिलेची आई बेगमपुरा पोलिसात दाखल झाली आणि तिने आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला होता पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली मात्र मोबाईल स्वीच ऑफ करून ठेवल्याने हे प्रेमी पोलिसांच्या हाती येत नव्हते.

गुप्त सूत्रांच्या माध्यमातून पोलिसांना हे प्रेमी युगुल हैदराबादला काही दिवस त्यानंतर शिरूरला त्यानंतर लातूर जिल्ह्यातील रेणापूरजवळील पानगाव इथे काम करत असल्याची माहिती मिळाली . अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या अधिकाऱ्यांनी तिथे धाव घेतली त्यावेळी ते पाथरवाडी येथील एका वीट भट्टीवर काम करत असल्याचे दिसून आले. पोलीस निरीक्षक शामकांत पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक सुषमा पवार यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन छत्रपती संभाजीनगर येथे आणलेले असून पीडित मुलीला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.


शेअर करा