..अन तिने खिडकीतून पुणे पोलिसांना हात दाखवला , नेपाळवरून आणून चक्क..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना पुण्यात समोर आलेली असून एका आरोपीने एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत चक्क नेपाळ इथून पळून आणलेले होते. पुण्यात राहायला आल्यानंतर तो तिचा छळ करू लागला त्यानंतर तिला त्याने कोंडून ठेवण्यास देखील सुरू केले मात्र या अल्पवयीन मुलीने नेपाळ येथील तिच्या भावाला फोन करून या प्रकाराबद्दल कल्पना दिली आणि बहिणीच्या सुटकेसाठी एका सामाजिक संस्थेच्या मदतीने नेपाळवरून तो चक्क पुण्यात आलेला होता त्यानंतर मुलीची सुटका करण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , बहिणीने फोन केला त्यावेळी त्या फोनचा नंबर इतकाच पुरावा त्याच्याकडे होता आणि बहिणीने केलेल्या खोलीच्या वर्णनावरून सामाजिक सुरक्षा पथकाने मोबाईलचे लोकेशन आणि वर्णनावरून एरियाचा अंदाज बांधला. पथक तिथे पोहोचले त्यावेळी या मुलीने खिडकीतून हात दाखवला आणि अखेर या मुलीचा शोध लागलेला आहे येरवडा पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केलेले असून मोहम्मद रफीक शेख ( वय 23 राहणार येरवडा मूळ राहणार नेपाळ ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.

मोहम्मद हा नेपाळ येथे राहत असताना त्याने तेथील एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलेले होते त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्यासोबत पलायन केलेले होते. काहीतरी काम धंदा शोधण्याच्या निमित्ताने दोघेही पुण्याला आले आणि त्यानंतर मोहम्मद याने तिचा छळ सुरू केलेला होता . ज्याच्यावर विश्वास ठेवून आपण पुण्यात आलो त्याने काही कालावधीनंतर तिला अक्षरशः घरात कोंडून ठेवलेले होते . अल्पवयीन मुलीने काहीतरी शक्कल लढवत अखेर आपल्या भावाला फोन केला आणि त्यानंतर अखेर तिची सुटका करण्यात आलेली आहे.


शेअर करा