
देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे समोर आलेल्या असून विवाहबाह्य संबंधातून रेल्वे अधिकारी असलेल्या एका व्यक्तीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे . त्यांच्या राहत्या घरात बेडरूममध्ये त्यांचा मृतदेह आढळून आलेला आहे. पाच मजली घराच्या तळमजल्यावर ते त्यांच्या मैत्रिणीसोबत राहत होते. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, अफरोज आलम अन्सारी असे मयत व्यक्ती यांचे नाव असून याप्रकरणी मुख्य आरोपी असलेला अभिषेक चौधरी याला महाराजगंज जिल्ह्यातून पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. पोलीस तपासाच्या दरम्यान अभिषेक आणि अफरोज आलम अन्सारी यांची पत्नी सादिया यांच्यात अनैतिक संबंध असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे . विशेष म्हणजे अफरोज आणि सादिया यांनी देखील सोळा वर्षांपूर्वी सोबत राहायला सुरू केलेले होते .
अफरोज आणि सादिया यांचे सोबत राहणे सुरु झाले त्यावेळी रेल्वेत काम करणारे अफरोज यांचे वय सादिया हिच्या दुप्पट होते. काही दिवसात त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला सुरू केले. 2012 मध्ये अफरोज यांनी वजीराबाद परिसरात जमीन खरेदी केली आणि ही जमीन सादिया हिच्या नावावर केली त्यानंतर त्यांनी तिथे चार मजली इमारत बांधली आणि त्यानंतर भाडेकरू ठेवण्यावरून त्यांच्यात वाद सुरू होऊ लागले.
सदर जागेत कोण भाडेकरू ठेवायचा . त्यांच्याकडून भाडे किती घ्यायचे यावरून वाद सुरू झाले त्यानंतर अखेर सादिया हिला घटस्फोटाची नोटीस पाठवण्यात आलेली होती त्यानंतर ती पुन्हा सासरी आली त्यावेळी आपल्या कोणत्याच निर्णयात तुम्ही हस्तक्षेप करायचा नाही अशी अट तिने अफरोज यांच्याकडे टाकलेली होती . कुणाला किती भाडे ? कुणाकडून किती भाडे घ्यायचे काय करायचे हा सर्व अधिकार मला हवा असे तिचे म्हणणे होते जो अफरोज यांनी मान्य केला.
आयआयटी परीक्षेची तयारी करणारा अभिषेक चौधरी हा सादिया यांच्या एका खोलीमध्ये भाडेकरू म्हणून आलेला होता याच दरम्यान सादिया आणि त्याचे सुत जुळले आणि या प्रकरणाची माहिती अफरोज यांना समजली. त्यांनी तात्काळ अभिषेक याला खोली खाली करण्यास सांगितले मात्र सादिया हिने अभिषेकची बाजू उचलून धरली आणि त्यानंतर त्यांनी आपल्या मार्गातून अफरोज यांना संपवण्याचाच प्लॅन रचला. घटना घडली त्या दिवशी सादिया तिचा पती अफरोज याच्यासोबत शेजारी झोपलेली होती अशी माहिती तिने तपासात दिलेली होती मात्र शेजारी झोपलेल्या पतीची हत्या झाली मात्र तरीदेखील तिला कशीच कुठलीच चाहूल लागली नाही त्यामुळे पोलिसांच्या चौकशीत तिची भंबेरी उडाली आणि पोलीस खाक्या दाखवल्यानंतर तिने अखेर खुनाची कबुली दिलेली आहे.