
शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न दुर्लक्षित राहिलेले असून त्यामध्ये थकीत ऊस बिल देण्याचा देखील प्रश्न तितकाच गंभीर आहे. अनेकदा साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना हे पैसे वेळेवर देण्यात येत नाहीत अनेकदा शेतकऱ्यांच्या कुटुंबासमोर देखील यामुळे अडचणी निर्माण होतात म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा येथे होळी गावात शेतकऱ्यानी मंगळवारी हातात पेट्रोलची बाटली घेऊन पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलेले होते. कारखाना प्रशासनाने तात्काळ बैठक घेऊन प्रश्न मागील मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर अखेर शेतकऱ्याची समजूत काढण्यात आली आणि त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले .
लोहारा तालुक्यातील होळी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लोकमंगल साखर कारखाना यांना ऊस दिलेला होता. ऊस देतेवेळी दोन हजार रुपयांप्रमाणे दर देखील ठरलेला होता आणि थकीत बिल रक्कम दिली नाही तर पाचशे रुपये दराचा हप्ता द्यावा असे देखील ठरलेले होते. शेतकऱ्यांनी अनेकदा कारखाना प्रशासनाला या संदर्भात पत्र दिले मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
5 जानेवारीपर्यंत थकीत बिल देण्यात यावे या नाहीतर मंगळवारी सामूहिक आत्मदहन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला होता त्यानंतर सर्व शेतकरी मंगळवारी सकाळी 11:00 च्या सुमारास हातात पेट्रोल घेऊन टाकीवर चढलेले होते. पाण्याच्या टाकीवर त्यांनी आंदोलन सुरू केले त्यानंतर अधिकाऱ्यांना जागा आली आणि त्यांनी तात्काळ या आंदोलनाची दखल घेत शेतकऱ्यांना लेखी आश्वासन देण्यात आले . तब्बल सहा तास आंदोलन करणारे व्यक्ती हे पाण्याच्या टाकीवरच बसून होते.