आता ‘ ह्या ‘ नेत्याला भाजपचा पाकिस्तानात जाण्याचा सल्ला

शेअर करा

भाजप

बिहारच्या आरजेडी सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय प्रधान सरचिटणीस अब्दुलबारी सिद्दीकी यांनी भारतात आता राहण्यासारखी परिस्थिती नाही म्हणून आपण आपल्या मुलाला आणि मुलीला परदेशात स्थायिक होण्याचा सल्ला दिलेला आहे असे एका भाषणात म्हटले होते मात्र मुलांनी त्यांचा निर्णय त्यांनी स्वतः विचार करून घ्यावा असे देखील त्यांनी म्हटले. त्यांच्या या विधानानंतर भाजपचा चांगलाच थयथयाट सुरू झालेला असून नेहमीप्रमाणे त्यांना पाकिस्तानमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे.

एका कार्यक्रमात बोलताना अब्दुलबारी सिद्दीकी यांनी त्यांच्या मुलांशी केलेल्या चर्चेचा उल्लेख करत ,’ माझा मुलगा सध्या हार्वर्ड विद्यापीठात शिकत आहे तर मुलगी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून उत्तीर्ण झालेली आहे. भारतात आता चांगले वातावरण राहिलेले नाही म्हणून परदेशात स्थायिक होणे गरजेचे आहे असा सल्ला त्यांना दिला आहे मात्र त्यांनी विचार करून स्वतः निर्णय घ्यावा असे आपले मत आहे ‘ असे म्हटले होते.

अब्दुलबारी सिद्दिकी यांच्या या विधानानंतर भाजपचा नेत्यांचा चांगलाच थयथयाट झालेला असून सिद्दिकी यांचे वक्तव्य हे भारताच्या विरोधात आहे. त्यांच्यावर राजकीय नेता म्हणून एवढा दबाव असेल तर त्यांना मिळणारे विशेषाधिकार त्यांनी सोडून द्यावेत आणि पाकिस्तानला रवाना व्हावे. त्यांना कोणी रोखणार नाही , असे म्हटले आहे.


शेअर करा