काँग्रेसमधूनही राहुल गांधींना पाठिंबा वाढला , निवडणुकीआधी केली ‘ ही ‘ मागणी

शेअर करा

भारत जोडो यात्रा काढल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून राहुल गांधी यांनी बेरोजगारी महागाई आणि देशातील वाढत चाललेला द्वेष याच्या विरोधात ही यात्रा काढलेली आहे. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ही यात्रा पायी चालणार असून अनेक नागरिकांचे देखील मोठ्या प्रमाणात राहुल गांधी यांना समर्थन वाढत आहे. भाजपकडून राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे कितीही चारित्र्यहनन करण्यात येत असले तरी देखील राहुल गांधी यांचा साधेपणा नागरिकांना भावत असून अनेक कुटुंबीय त्यांच्यासोबत एक सेल्फी घेण्यासाठी रस्त्यावर गर्दी करत आहेत.

राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढत चाललेली असल्याने त्यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात यावी यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते अशोक गेलहोत , पी चिदंबरम व महाराष्ट्रातील देखील अनेक नेत्यांनी होकार दर्शवला असून गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीने देखील त्यांना अध्यक्ष बनवण्याच्या मागणीचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. 2024 च्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून मोठ्या प्रमाणात काँग्रेसने आक्रमक धोरण अवलंबलेले पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष बनण्यास अनेकदा नकार दिलेला असला तरी देखील राहुल गांधी यांचा साधेपणा नागरिकांना भावत असल्याने त्यांच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे.

गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीने देखील राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाचा पाठिंबा देणारा ठराव एकमताने मंजूर केला असून अनेक राज्यातून आता ही मागणी सुरू झालेली आहे. काँग्रेस अध्यक्ष पदासाठी 24 ते 30 सप्टेंबर रोजी नामांकन दाखल करण्यात येणार असून एकापेक्षा अधिक उमेदवार जर यामध्ये राहिले तर 17 ऑक्टोबरला मतदान घेण्यात येणार आहे. गोदी मीडियामध्ये मात्र राहुल गांधी यांच्या यात्रेला कुठलेच स्थान दिसत नसून नेहमीप्रमाणे ज्या प्रश्नांशी नागरिकांना कुठलेच घेणे देणे नाही असे प्रश्न निर्माण करून नागरिकांची मूळ प्रश्नांपासून दिशाभूल केली जात आहे.


शेअर करा