
जिवंत असताना महात्मा गांधी ज्या व्यक्तींना या प्रवृत्तींना खटकत होते त्यांना मारलेले गांधी देखील आता जास्त त्रास देऊ लागले आहेत म्हणून त्यांची स्मृती भ्रष्ट करण्याचा कार्यक्रम विरोधक राबवत आहेत. ‘ मजबूरी का नाम गांधी ‘ असे ते म्हणतात पण गांधीशिवाय त्यांचे काही चालत नाही आणि महात्मा गांधी त्यांना झेपतही नाही असा टोला महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी विरोधकांना लावलेला आहे.
सातारा जिल्ह्यातील कराड येथील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, ‘ सध्या देशातील वातावरण खूपच चिंतेचे आहे मात्र आमच्यासारख्यांनी कधी आशा सोडलेली नाही आणि आम्ही ती सोडणार नाही कारण आम्ही आमचे विचार घेऊन वाटचाल करणार आहोत. पंतप्रधान मोदीनी देखील आमच्या गुणांची दखल घेत आम्हाला आंदोलनजीवी असे म्हटले आहे मात्र आम्हाला त्याचे कौतुक आहे .
तुषार गांधी पुढे म्हणाले की, ‘ ज्यांच्याकडे इतिहास नाही ते 56 इंच छातीवाले बढाया मारत फिरत आहे पण ज्या पोलादी छातीने गोळ्या झेलल्या ते काँग्रेसवाले का गप्प आहेत हे समजत नाही. महात्मा गांधी लोकांना आवाहन करण्यापूर्वी स्वतः झोकून आंदोलनात काम करत असत त्यामुळे त्यांना प्रतिसाद देखील मिळत असेल मात्र दुर्दैवाने काँग्रेसकडे सध्या अनुकरणीय असे नेतृत्व नाही. करेंगे या मरेंगे हा महात्मा गांधींचा नारा होता याचा अभ्यास काँग्रेसने करायला हवा. देशाच्या उभारणीत काँग्रेसचा मोठा वाटा असून या इतिहासाचा काँग्रेसने अभिमान बाळगला पाहिजे आणि हा इतिहास नव्या पिढीसमोर घेऊन जावा मग या विचारांना कोणीही हरवू शकत नाही, असे देखील ते पुढे म्हणाले.