जर्मनीचे स्वप्न भंगल्याचे लक्षात येताच एकीकडे ‘ तो ‘ गेला अन दुसरीकडे..

शेअर करा

देशातील अनेक तरुण चांगले पॅकेज मिळावे म्हणून नोकरीसाठी परदेशात जाण्याच्या प्रयत्नात असतात मात्र यात फसवणुकीचे देखील अनेक प्रकार समोर येत असून अशीच एक घटना पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये समोर आलेले असून एका लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्याने फसवणूक झाल्यानंतर विष प्राशन करून आत्महत्या केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , विक्रांत मसीह असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो त्याची प्रेयसी हिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. त्याला जर्मनीला नेतो असे सांगून त्याच्या नातेवाईकाने त्याच्याकडून काही पैसे घेतलेले होते मात्र त्यानंतर त्याला जर्मनीत नोकरी देखील मिळाली नाही आणि त्याचे पैसे देखील समोरील व्यक्तीने परत केले नाहीत. त्याची प्रेयसी असलेली नेहा हिला त्याच्या आत्महत्येची माहिती समजली आणि तिने देखील त्यानंतर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केलेली आहे . जर्मनीला स्थायिक होण्याची त्यांची इच्छा होती मात्र त्याआधीच हा दुर्दैवी प्रकार समोर आलेला आहे.

विक्रांत याने त्याच्या एका नातेवाईकाला जर्मनीमध्ये सेटल व्हायचे आहे अशी इच्छा व्यक्त केलेली होती त्यानंतर या नातेवाईकांनी त्यासाठी लागतील असे सांगितले आणि विक्रांत याने पैसे जमवत त्याला ही रक्कम दिलेली होती मात्र त्याच्या नातेवाईकांनी त्याला परदेशी पाठवले नाही आणि पैसे देखील परत केले नाहीत अशी माहिती विक्रांतचा भाऊ रोहित याने पोलिसांना दिलेली असून नातेवाईकांनी विश्वासघात केल्याने आपले जर्मनीतला जाण्याचे स्वप्न भंगले आहे हे लक्षात आल्यानंतर दोघांनीही आत्महत्या केलेली आहे . पोलिसांनी चार नातेवाईकांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा नोंदवलेला आहे.


शेअर करा