
मानसिक विकृतीतून खून करणारा सिरीयल किलर आदेश खामरा ( वय 52 वर्ष ) हा सध्या तुरुंगामध्ये प्रेरणादायी आणि धार्मिक ग्रंथ वाचत असल्याची माहिती आहे. मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यात मागील एका दशकापासून त्याने तब्बल 34 हत्या केलेल्या असून भोपाळ पोलिसांनी त्याला 2018 साली सुलतानपूर येथून बेड्या ठोकल्या होत्या.
आदेश खामरा सध्या भोपाळमध्ये मध्यवर्ती कारागृहात असून त्याने त्याच्यावरील सर्व गुन्ह्यांची कबुलीही दिली आहे. वाहतूक करत असलेले ट्रक चालक तसेच इतर वाहनांमधून करणारे नागरिक हे त्याचे लक्ष असायचे. त्यांचा खून केल्यानंतर आरोपी त्यांच्या गाडीतील माल आणि सामान लंपास करायचा. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी उच्चशिक्षित असून सध्या तो तुरुंगात उपलब्ध असलेले धार्मिक आणि प्रेरणादायी ग्रंथ वाचतो तसेच तुरुंगातील सर्व नियमांचे आणि अटींचे पालन करतो असेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेले आहे.