
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी नागपूर येथे बोलताना महापुरुषांचा अवमान होत असताना तुमची सटकत कशी नाही ? असा संतप्त सवाल केलेला असून तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना यासंदर्भात जाब विचारला पाहिजे आणि तुमची सटकली पाहिजे असा देखील सल्ला दिलेला आहे.
अजित पवार म्हणाले की, ‘ संविधानिक पदावर बसलेले लोक राष्ट्रपुरुष यांचा अपमान करतात अशा लोकांना परत पाठवायला हवे. त्यांची हकालपट्टी करायला हवी आणि त्यांना जेलमध्ये टाकण्यात यावे जेणेकरून त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडेल ‘ असे देखील ते म्हणाले. विधानभवनात शाईचे पेन आणायला मनाई आहे मग मुख्यमंत्र्याचे शाईचे पेन असेल तर ते अगोदर जप्त करा, असे देखील अजित पवार पुढे म्हणाले.