तेंडुलकर अन कोहली गप्प का ? जितेंद्र आव्हाड यांचा खडा सवाल

शेअर करा

भारतीय महिला कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रीजभूषण सिंह यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केलेले असून पोलिसांनी आतापर्यंत त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला नाही. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार वृत्तानुसार ब्रिजभूषण सिंह यांच्या खोलीमध्ये जाऊन त्यांना त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिला खेळाडूंना जबरदस्ती करण्यात येत होती याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे यासाठी भारतीय महिला कुस्तीपटू धरणे आंदोलनाला बसलेल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या महिला कुस्तीपटूंना समर्थन तर दिलेले आहेत सोबत सोयीस्कर भूमिका घेणाऱ्या क्रिकेटपटूंना देखील चांगलीच चपराक लावलेली आहे. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांना देखील त्यांनी टॅग केलेले आहे.

काय आहे जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट ?

‘ अभिनव बिंद्रा आणि निरज चोप्रा हे आणखी दोन ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीगीर मुलींच्या लैंगिक छळवणूक विरोधातील आंदोलनात आज रस्त्यावर उतरले मात्र खासदार ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई करायला तयार नाही. तेंडुलकर कोहली काही बोलतात का पाहू ? सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आत्ताच अशी बातमी आली . कपिल देव या भगिनींसाठी उभा राहिला ‘ असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलेले आहे

सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली सोबतच इतरही अनेक खेळाडू यांना व्यक्त होण्यासाठी त्यांच्यावर काही दबाव आहे का ? सत्तेला घाबरून अनेकदा सोयीस्कर भूमिका राजकीय पदाधिकारी घेतातच मात्र त्यामध्ये चक्क सिनेअभिनेते आणि क्रिकेटपटू तसेच इतर खेळाडू हे देखील आता सामील झालेले दिसून येत आहेत.


शेअर करा