
महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार नाशिक शहराजवळ नाशिक रोड येथे समोर आलेला असून लग्नाचे आमिष दाखवत सातत्याने अत्याचार करणाऱ्या एका संशयित व्यक्तीच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . सामनगाव रोड येथील हा आरोपी असून त्याने एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवलेले होते.
उपलब्ध माहितीनुसार, अमोल प्रकाश वारा असे आरोपी व्यक्तीचे नाव असून एक डिसेंबर 2021 पासून तर 14 मे 2023 पर्यंत आरोपीने परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी या तरुणीला घेऊन जात तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केलेले आहेत आणि अखेर या तरुणीला दिवस गेल्यानंतर तिने लग्नासाठी अमोल याला मागणी केलेली होती मात्र अमोल याने तिची मागणी धुडकावून लावली अन अखेर पीडित तरुणीने पोलिसात जात त्याच्या विरोधात तक्रार दिलेली आहे.
पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार अमोल वारा , प्रकाश वारा , जयश्री वारा आणि अमोलची बहिण गीता यांनी दिला बाळ काढून टाकण्याचा सल्ला दिला सोबतच अमोल याने लग्नाला देखील नकार दिला आणि तिला जातीवाचक शिवीगाळ केली. त्यामुळे पिढीत तरुणीने अखेर नाशिक रोड पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात तक्रार दिलेली असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.