दहावीतील मुलीला चौथा महिना , सोनोग्राफी केंद्रातच आरोपीचे नाव सांगितलं..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार अमरावती जिल्ह्यात समोर आलेला असून ‘ जर तू माझी झाली नाही तर तुला दुसरी कुणाचीच होऊ देणार नाही माझ्याशीच लग्न कर ‘ अशी धमकी देत एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण करण्यात आलेले आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी ही सध्या चार महिन्यांची गर्भवती असून मंगळूर दस्तगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 27 मे रोजी ही घटना समोर आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, शुभम शिवदास मोकासे ( वय 22 राहणार कावळी ) असे या प्रकरणातील आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याची इयत्ता दहावीत शिकत असलेल्या पंधरा वर्षाच्या मुलीसोबत लग्नात ओळख झाली होती त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आरोपीने तिला घरामागे बोलावले होते त्यावेळी त्याने ‘ तू माझी झाली नाही तर कुणाची होऊ देणार नाही माझ्याशी लग्न कर ‘ असे म्हणत तिचे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली. पीडित मुलीने विरोध केला तर त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली आणि आरोपीने दोन ते तीन वेळा तिच्यासोबत अत्याचार केलेला होता.

२४ मे रोजी मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर कुटुंबीयांनी तिला यवतमाळ येथील एका रुग्णालयात नेले होते त्यावेळी सोनोग्राफी केली असता ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आलेले आहे. पीडित मुलीने त्यानंतर सगळा घटनाक्रम सोनोग्राफी केंद्रातच आपल्या आई-वडिलांना सांगितलेला असून पोलिसांनी आरोपी शुभम याच्या विरोधात बलात्कार धमकी आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे .


शेअर करा