
उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव घेत एक खळबळजनक दावा केलेला असून त्यामध्ये नितीन गडकरी यांची भाजपमध्ये सध्या घुसमट होत असून भविष्यात त्यांना बाजूला सारण्यात येणार आहे अशी चर्चा सुरू असल्याचे देखील वक्तव्य केलेले आहे. नितीन गडकरी हे भाजपचे जुने जेष्ठ नेते आहेत. महाराष्ट्रातील खासदारांची काम करणारे ते एकमेव मंत्री होते मात्र त्यांना सध्या काम करू दिले जात नाही , असेही ते पुढे म्हणाले.
मराठवाड्यातील साडेसतरा हजार कोटींची कामे त्यांना आतापर्यंत करू दिली नाही आणि त्यातून मराठवाड्याचे नुकसान झालेले आहे. संघ परिवाराशी संबंधित असल्याकारणाने त्यांना पूर्णतः बाजूला करण्यात आलेले नाही. नितीन गडकरी हे उद्धव ठाकरे यांना भेटत असतात आणि फोनवर देखील बोलतात असा देखील दावा खैरे यांनी केलेला आहे. मुस्लिम समाज आणि वंचित बहुजन आघाडी देखील आता आमच्याकडे वळायला लागलेली असून भाजपकडून पुन्हा भीमशक्ती आणि शिवशक्ती यात भांडणे लावण्याचे प्रकार सुरू आहेत. भाजप कोणत्याही थराला जाऊन राजकारण करण्यास मागे पुढे पाहत नाही, असा देखील आरोप खैरे यांनी केलेला आहे.