पुण्यातील नामांकित कंपनीत कार्यरत महिलेला अमेरिकेत पतीकडून ‘ वेगळाच ‘ अनुभव

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना पुणे इथे समोर आलेली असून पुणे येथील एका तरुणीचे एका अमेरिकेत कार्यरत असलेल्या व्यक्तीसोबत लग्न झाल्यानंतर तिच्यासोबत एक गंभीर प्रकार घडल्याचे समोर आले आहे . एका २८ वर्षाच्या विवाहितेने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलिसांनी पतीसह सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अमेरिकेतील टेक्सास, कर्नाटक आणि फुरसुंगीत जानेवारी ते २६ डिसेंबर २०२१ दरम्यान घडला असल्याचे पीडितेचे म्हणणे आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला उच्चशिक्षित असून पुण्यातील एका नामांकित कंपनीत काम करते. तिचा पती देखील उच्च शिक्षित असून तो सॉफ्टवेअर अभियंता आहे आणि तो अमेरिकेतील टेक्सास येथे काम करत आहे. फिर्यादी यांच्यासोबत लग्न झाल्यावर दोघेही अमेरिकेत गेले होते. मधुचंद्राच्या रात्री मिलनानंतर तुला रक्तस्राव का झाला नाही ? असा प्रश्न विचारत त्याने आपल्या चारित्र्यावर संशय घेत त्याने त्रास दिल्याचे पीडितेचे म्हणणे आहे .

अमेरिकेत त्यांची भांडणे झाल्यावर आता दोघेही परत भारतात आले असून आता सध्या ते फुरसुंगी येथे राहत आहेत. अमेरिकेत असताना पतीने आपल्याला धक्कादायक पद्धतीने त्रास दिला आणि लग्नापूर्वी कौमार्यभंगाचा ठपका ठेवून आपला मानसिक तसेच शारीरिक छळ केला आहे. चारित्र्याचा संशय घेऊन या पतीने आणि तिच्या सासू, सासऱ्यांनी फिर्यादीचा ‘ घटस्फोट दे ‘ असे सांगत पीडितेच्या मानसिक व शारीरिक छळ केला, अशी तक्रार तिने पोलिसात दिली असून हडपसर पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत.


शेअर करा