बायको नांदायला येईना म्हणून ‘ भगत ‘ व्यक्तीला पैसे दिले अन ..

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25 मे रोजी एका वृद्ध भगत असलेल्या व्यक्तीचा खून झाल्याचे आढळून आलेले होते. अवघ्या 24 तासांच्या आत मांडवी पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला गजाआड केलेले असून अंधश्रद्धेचा एक अजब प्रकार यात समोर आलेला आहे. माहेरी गेलेली आपली बायको घरी यावी यासाठी महिलेच्या पतीने जागरण विधी करण्यासाठी या भगत असलेल्या व्यक्तीला दोन हजार रुपये दिले होते मात्र त्याने विधी केला नाही म्हणून त्याची हत्या करण्यात आलेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या दोन हजार रुपयांसाठी ही हत्या झाल्याचे समोर आलेले असून पोलिसांनी तीन पथके तयार करून सीसीटीव्ही फुटेज याच्या आधारे विनोद उर्फ कांद्या महादू बसवंत ( वय ३५ ) याला पोलिसांनी अटक केलेली आहे . विनोद याने त्याची बायको माहेराहून पुन्हा आपल्याकडे नांदण्यास यावी यासाठी जागरणविधी करावा म्हणून भीमा नावाच्या एका भक्ताला दोन हजार रुपये दिले होते.

जागरणविधी केला तर आपली बायको पुन्हा आपल्याकडे नांदायला येईल अशी त्याची धारणा होती मात्र भगत असलेल्या या व्यक्तीने हा विधी केला नाही म्हणून विनोद याने भिवा नावाच्या भगताला दारू पाजली. त्याच्याबरोबर बाचाबाची झाली आणि त्यानंतर त्याने निर्जनस्थळी नेऊन त्याचा खून केला. विनोद हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी देखील त्याला खुनाच्या गुन्ह्यातच अटक करण्यात आलेली होती मात्र कोरोना काळात त्याला सोडण्यात आलेले असल्याने त्याने पुन्हा दुसरा गुन्हा केलेला आहे.


शेअर करा