‘ भारताला पंतप्रधान नाही तर राजा मिळालेला आहे अन त्याला वाटतंय की.. ‘

शेअर करा

केंद्र सरकारवर गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल सुरू केलेला असून उत्तराखंड येथे राहुल गांधी यांनी, ‘ देशातील कोरोना संसर्ग शिगेला पोहोचला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना रस्त्यावर उभे राहण्यास भाग पाडले. अशा प्रकारचे कृत्य काँग्रेस पक्ष कधीही करणार नाही ‘, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी उत्तराखंड येथील सभेत केले आहे.

काय म्हणाले राहुल गांधी ?

सध्या भारताला पंतप्रधान नाही तर राजा मिळालेला आहे. त्यांना निर्णय घेताना जनतेने सतत गप्प रहावे असे वाटते. आमचा पक्ष शेतकरी, तरुण कामगार आणि गरिबांसाठी कधीच दरवाजे बंद करणार नाही तर आम्हाला त्यांच्यासोबत भागीदारी हवी आहे.पंतप्रधान जर सर्वांसाठी कामे करत नसतील तर ते पंतप्रधान होऊ शकत नाहीत या न्यायाने पंतप्रधान मोदी हे पंतप्रधान वाटतच नाही. सध्या देशाला पंतप्रधान राहिलाच नाही. आता राजा आमचे नेतृत्व करतो आहे आणि हे निर्णय घेताना इतर आणि गप्प राहावे असे त्याला वाटते.

सध्या दोन भारताची निर्मिती करण्यात आलेली असून त्यातील एक भारत गरिबांसाठी तर दुसरा श्रीमंतासाठी आहे. देशातील शंभर लोकांच्या हातामध्ये 40 टक्के संपत्ती असून अशा प्रकारची विषमता जगात अन्यत्र कुठेही पाहायला मिळणार नाही. उद्योगपतींनी कधीच ब्रिटिशांच्या विरोधात लढा दिलेला नाही तर त्यांच्याविरोधात शेतकरी आणि कामगार यांनी संघर्ष केलेला आहे आहे, ‘ असे देखील राहुल गांधी म्हणाले


शेअर करा