भोसरीतील ‘ त्या ‘ तरुणीला बुलढाण्याच्या लॉजवर बोलावलं होत अन..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून पुण्याच्या भोसरी भागात राहणाऱ्या 22 वर्षांच्या तरुणीवर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे नेऊन अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे. शेगाव येथील एका लॉजवर तिच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडलेला असून आरोपीने तिचे बळजबरीने शारीरिक शोषण केले आहे. सदर घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , सिद्धांत मुरलीधर खाचणे ( वय 28 ) असे आरोपीचे नाव असून पीडित बावीस वर्षांची तरुणी एक वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर इथे एका लग्नासाठी आलेली होती त्यावेळी तिची बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील हरणखेड येथील सिद्धांत या आरोपीसोबत ओळख झाली. त्यांचे फोनवर बोलणे वाढले आणि त्यांच्यात प्रेमप्रकरण सुरू झाले त्यावेळेस सिद्धांत याने अनेकदा तिची भेट घेतली आणि तिचे फोटो देखील काढले.

काही दिवस उलटल्यानंतर सिद्धांत हा तिला लग्नासाठी तगादा करू लागला. आपण प्रेमविवाह करू असे तो म्हणत असायचा मात्र तरुणीने लग्नाला नकार दिला त्यानंतर त्याने तिला खामगाव येथे बोलावून घेतले आणि त्यानंतर मोटरसायकलवर बसून शेगाव येथे घेऊन गेला . तेथील एका लॉजवर त्याने तिच्यासोबत जबरदस्ती करत शारीरिक संबंध ठेवले आणि तिचे नको त्या अवस्थेतील काही फोटो काढले. सदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी तो तिला देऊ लागला त्यावेळी तरुणीने कसेबसे करत तेथून पळ काढला.

पीडित तरुणी ही तात्काळ पुण्याला निघून आली आणि तिने भोसरी इथे जाऊन पोलिसात फिर्याद देण्याचा प्रयत्न केला मात्र गुन्हा हा शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला असल्याकारणाने सदर गुन्हा तिकडे वर्ग करण्यात आलेला असून अशा स्वरूपाच्या घटना सातत्याने होत असल्याने तरुणींनी काळजी घेणे गरजेचे झालेले आहे.


शेअर करा