‘ माझ्यासोबत खेळ खेळला ‘ वहिनीने दरवाजा ठोठावला तोपर्यंत..

शेअर करा

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक असा प्रकार अमरावती जिल्ह्यात समोर आलेला असून एका तरुणीच्या प्रेमात आकंठ बुडाल्यानंतर ज्या तरुणीला आपण आपले सर्वस्व मानले होते तिने लग्नाला देखील होकार दिला मात्र काही काळातच ती बदलली आणि तिचे असे वर्तन असह्य झाल्याने तिला जाब विचारला त्यावेळी तिने लग्नाला नकार दिला त्यामुळे हा तरुण डिप्रेशन मध्ये गेला आणि त्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने तिने माझ्यासोबत खेळ खेळला अशी सुसाईड लिहून ठेवलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, राहुल संजय चौरागडे ( वय 22 राहणार जनता कॉलनी ) असे या तरुणाचे नाव असून घटनास्थळावर ही सुसाईड नोट आढळून आलेली आहे. 31 मे रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याने राहत्या घरी हा प्रकार केलेला असून त्याच्या वहिनीने वरती जाऊन पाहिले त्यावेळी त्याने गळफास घेतलेले दिसून आले. खोलीतील टीपॉयमध्ये त्याने एक सुसाईड नोट देखील लिहून ठेवलेली होती.

सुसाईड नोटमध्ये म्हटल्याप्रमाणे आपल्या मृत्यूला एक मुलगी कारणीभूत आहे. तिने आपल्याला लग्नासाठी होकार दिलेला होता मात्र ती आपल्याशी खेळ खेळली त्यामुळे आपण आत्महत्या करत आहोत असे त्याने म्हटले आहे. मयत तरुणाच्या वडिलांनी राजापेठ पोलीस ठाण्यात यासंदर्भात माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदवलेला असून संबंधित मुलीला देखील चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , राहुल याचे या मुलीसोबत तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्याने तिच्यावर जीव ओवाळून टाकलेला होता मात्र गेल्या काही दिवसांपासून तिचे इतर ठिकाणी प्रेमसंबंध सुरू झाल्याचा संशय या तरुणाला येत होता त्यामुळे त्याने तिला जाब विचारला मात्र तिने लग्नाला टोलवाटोलवी केली त्यामुळे तो डिप्रेशन मध्ये गेलेला होता त्यातून त्याने हा प्रकार केल्याचे प्राथमिक निष्कर्ष काढला जाऊ शकतो, असे सांगण्यात आलेले आहे.


शेअर करा