‘ माफ करा ‘ लिहून नवजात बाळाला सोडून आई गायब , लक्षात आले तेव्हा ..

शेअर करा

देशात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या राजस्थानमधील जयपूर परिसरात समोर आलेले असून ‘ मला आधीच सहा मुली आहेत त्यामुळे मला सासू त्रास देत आहे म्हणून मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे. माझ्या मुलीचे तुम्ही संगोपन करा तुमचे उपकार होतील मला माफ करा ‘ असे लिहून एका महिलेने रुग्णालयाजवळ नवजात अर्भकाला सोडून पलायन केलेले आहे . राजस्थानच्या भरतपूरमधील ही घटना आहे.

एका रुग्णालयाच्या बाहेर रडणाऱ्या बाळाचा आवाज ऐकू आला त्यानंतर परिचारक असलेल्या व्यक्तीने तिथे धाव घेतली त्यावेळी एक नवजात बाळ रडताना आढळून आले सोबतच तिच्याजवळ एक चिठ्ठी देखील आढळून आलेली होती. गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना समोर आलेली असून बाळाचे नातेवाईकजवळ आढळून आले नाही म्हणून पोलिसांना या प्रकरणी खबर देण्यात आली.

रामवीर असे परिचारक असलेल्या या व्यक्तीचे नाव असून डॉक्टरांनी तात्काळ या नवजात मुलीवर उपचार सुरू केले . सुदैवाने इतकी भीषण उष्णता असून देखील मुलीची प्रकृती व्यवस्थित आहे . परिसरात काही मोकाट प्राणी देखील आहेत मात्र सुदैवाने तिला काही झाले नाही. बालकल्याण समितीचे सदस्य तिथे पोहोचले आणि त्यांनी घटनेची नोंद घेतली. बाळाला सोडून जाणाऱ्या या आईचा तपास सध्या पोलीस करत आहेत तर मुलगी तीन दिवसांची असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे .


शेअर करा