‘ मी सुंदर आहेच म्हणून मी दिसताच पोलिसांनी.. ‘ महिलेचे पोलिसांवर धक्कादायक आरोप

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका महिलेची जोरदार चर्चा सुरू असून अटक केल्यानंतर या महिलेने अनेक धक्कादायक आरोप केलेले आहेत. हॉटेलचे बिल चुकवले या कारणाखाली या 28 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली होती मात्र या महिलेने मी सुंदर दिसत आहे म्हणून मला अटक केली तसेच पोलिसांनी माझ्यावर बलात्कार करण्याचा देखील प्रयत्न केला असेही म्हटले आहे.

सदर प्रकरण हे अमेरिकेतील असून या महिलेचे नाव हेन्ड बसतामी असे आहे. महिला हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम करत असून तिने रीड येथील एका आंतरराष्ट्रीय विमानतळावर हॉटेलचे बिल दिले नाही असा त्याच्यावर आरोप आहे. चिली असे या हॉटेलचे नाव असून बिल दिले नाही म्हणून पोलिसांना बोलावण्यात आले आणि त्यानंतर तिला अटक करण्यात आली.

तिला अटक केल्यानंतर तिने पोलिस अधिकाऱ्यांसोबत भांडण केले आणि त्यानंतर माझा छळ केला जात आहे कारण मी सुंदर आहे. पोलिसांनी आतापर्यंत माझ्या इतकं सुंदर कोणालाच पाहिलेलं नाही त्यामुळे त्यांनी मला पाहिल्यानंतर लगेच माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असे देखील तिचे म्हणणे आहे. पोलिसांनी आपल्यासोबत गैरवर्तन केले आहे असे तिचे म्हणणे असून सदर प्रकरण सध्या न्यायालयात सुरू असल्याचे समजते.


शेअर करा