
देशात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या मध्य प्रदेशातील भेंडा इथे समोर आलेले असून एका विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. आरोपी व्यक्तीने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिचे दागिने देखील हडप केले मात्र सातत्याने तो तिला तशाच पद्धतीने त्रास देत असल्याने अखेर या महिलेने आत्महत्या करून आपल्या आयुष्याचा अंत केलेला आहे.
घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट मिळालेली असून त्यामध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव दीपेश असे असल्याचे समोर आलेले आहे. मयत महिलेचा पती याने पोलिसांशी बोलताना माझ्या पत्नीला दीपेश याने प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते . दीपेश आणि पत्नी यांच्यात प्रेमसंबंध जुळावेत म्हणून काही लोकांनी दिपेशला मदत केली त्यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे असे देखील त्याने म्हटलेले आहे.
सर्वजणांनी प्रयत्न केल्यानंतर अखेर आपली पत्नी ही दिपेशाच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली आणि त्यानंतर त्याने तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला . तिचे काही अश्लील व्हिडिओ बनवले आणि तिला ब्लॅकमेल करत तिचे पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास केले . जितके सगळे होऊन देखील सातत्याने त्याचा त्रास सुरू असल्याकारणाने अखेर तिने आत्महत्या केली असे पतीचे म्हणणे आहे. मयत महिलाही एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती.