
राष्ट्रवादीच्या धडाडीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात एक्टिव पाहायला मिळतात. सोशल मीडियावर अनेक महिला पदाधिकाऱ्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो त्याला रूपाली पाटील ठोंबरे देखील अपवाद नाहीत. आपली भूमिका नेहमीप्रमाणे स्पष्टपणे त्या मांडत असतात मात्र त्यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे अनेकदा त्यांना लक्ष्य करण्यात येते. रुपाली पाटील ठोंबरे यांनी समाज माध्यमांवर सक्रिय असणाऱ्या व्यक्तींना ‘ माझ्या हक्काच्या फेसबुक पेजवर घाण कमेंट करणे बंद करावे ‘ असे आवाहन केले आहे.
रूपाली पाटील म्हणाल्या की, ‘ सोशल मीडियावर माझे स्वतःचे मालकी हक्काचे पेज आहे . समाजातील चुकीच्या घटना, केलेले चांगले काम यासाठी मी सोशल मीडियाचा वापर करते. माझ्या पेजवर आणि वडीलधारी मंडळी, बंधू-भगिनी , मैत्रिणी, मित्र तसेच चांगल्या घरातील लोक माझ्या पेजवर आहेत. आमचा मोठा परिवार आहे. जाणूनबुजून अंधभक्त तसेच घाण कमेंट करणाऱ्या लोकांनी माझ्या पेजवर येऊ नये ‘, असेही त्यांनी म्हटलेले आहे.
रुपाली पाटील ठोंबरे यांनी असे आव्हान केल्यानंतर त्याला आता कितपत प्रतिसाद मिळेल हे पाहावे लागेल मात्र सोशल मीडियावर काही पगारी ट्रोलर राजकीय भूमिकेला विरोध केल्यानंतर अश्लील शब्दात शिवीगाळ करतात तसेच पोस्ट केलेल्या व्यक्तीचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करतात असे प्रकार अनेकदा समोर आलेले आहेत अर्थात हे सर्व प्रकार बहुतांश वेळा फेक अकाउंटवरून केले जात असल्याने अनेक नागरिक तसेच याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे इतरांना शिवीगाळ करण्याचे अशा व्यक्तींचे मनोधैर्य वाढत जाते.