महाराष्ट्रात पुन्हा ‘ एक दुजे के लिये ‘, कुठे घडलाय प्रकार ?

महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत असताना अशीच एक घटना सांगली जिल्ह्यात उघडकीला आली असून एका प्रेमीयुगुलाने एमआयडिसी येथील एका खत कारखान्याच्या गोदामात गळफास लावून आत्महत्या केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मिरज तालुक्यातील बामनोली येथील दत्तनगर एमआयडीसीत हा प्रकार उघडकीला आला असून सोमवारी ही घटना उघडकीला आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप पर्यंत समजले नसून सदर प्रकरणी पोलिस तपास सुरू आहे.

पांडुरंग दादासाहेब दुधाळ ( वय 21 राहणार चिंतामणीनगर सांगली ) आणि काजल सुरेश सायार ( वय सोळा राहणार दत्तनगर बामनोली ) अशी मृतांची नावे आहेत. मयत पांडुरंग हा खत गोदामात कामाला होता तर काजल ही शिकत होती. पांडुरंग काम करत असलेल्या गोदामानजीक काजल ही राहायला होती त्यामुळे त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते, अशी माहिती समोर आलेली आहे.