सना खानने चाखली ‘ त्या ‘ चहाची चव , किंमत वाचून थक्क व्हाल

एकेकाळी अभिनयक्षेत्रात सक्रिय असलेली सना खान सध्या कलाविश्वापासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. धर्माचं कारण देत सनाने अभिनयक्षेत्राला रामराम केला आणि त्यानंतर तिने गुजरातमधील व्यावसायिक मुफ्ती अनस सैयदशी निकाह केला. सनाने इन्स्टाग्रामवर नुकतेच काही फोटो पोस्ट केले असून त्या फोटोमध्ये ती बुर्ज खलिफामधील अत्यंत महागड्या हॉटेलमध्ये बसून सोन्याचा वर्ख असलेला चहा पिताना दिसत आहे.

दुबईतील बुर्ज खलिफामध्ये असलेल्या जगातील सर्वांत उंचावरील ‘अॅटमॉस्फिअर दुबई’ या रेस्तराँमध्ये बसून सना खान चहाचा आस्वाद घेताना पहायला मिळतेय. ‘कधी तुमच्या आयुष्याची तुलना अशा लोकांशी करू नका, जे आयतं मिळालेल्या पैशांवर मजा करतात. असे लोक जरी बाहेरून यशस्वी झाल्याचे दिसत असले तरी अल्लाहच्या समोर त्यांची काहीच किंमत नसते आणि हेच सर्वांत महत्त्वाचं असतं’, असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

सना दुबईतील ज्या रेस्तराँमध्ये बसून या चहाचा आस्वाद घेतेय, तिथे चहा आणि इतर खाद्यपदार्थ अत्यंत महाग मिळतात. 24 कॅरेट सोन्याचा वर्ख असलेल्या या चहाची किंमत 160 दिरहम म्हणजेच जवळपास 3300 रुपये आहे.सना हिने अभिनयक्षेत्र सोडण्यापूर्वी तिचं नाव कोरिओग्राफर आणि डान्सर मेल्विन लुईसशी जोडण्यात आलं होतं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. मेल्विनशी ब्रेकअप केल्यानंतर तिने धर्माचं कारण देत अभिनयक्षेत्रालाही कायमचा रामराम केला.