सनी लियोनीने ‘ त्या ‘ वेळचे फोटो केले शेअर , पतीलाही दिल्या शुभेच्छा

बॉलिवूडमध्ये अवघ्या काही वर्षात यशाचे शिखर गाठणारी सनी लियोनी ही आपल्या वेगवेगळ्या अदाकारामुळे सोशल मीडियात चांगलीच चर्चेत असते. बॉलिवूडची हॉट एक्ट्रेस म्हणून तिची ओळख असून तिने आता सोशल मीडियावर मीडियावर ती आणि तिचा पती डॅनियल वेबर यांच्या लग्नाची अकरा वर्षे पूर्ण झाली म्हणून आपल्या लग्नाचा फोटो शेअर केलेला आहे. तिच्या या फोटोवर सोशल मीडियात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

सनी लियोनीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती लाल रंगाच्या जोड्यात असून गुलाबाच्या पाकळ्यावर डेनियल वेबरसोबत बसलेली आहे आणि विवाहाचे विधी संपन्न होत आहेत. हा फोटो शेअर करताना तिने लग्नाच्या क्षणांच्या स्मृतीला उजाळा दिलेला असून आमच्या लग्नाला अकरा वर्षे पूर्ण झाली.

ही वेळ अशी होती की आमच्याकडे एकही पैसा नव्हता. 50 पेक्षा कमी पाहुणे होते. भेट म्हणून आलेल्या लिफाफ्यातील पैशातून फुले आणावी लागली होती आणि अशा अनेक गोष्टी म्हणत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत सोबतच आपला पती डेनियल वेबर याला देखील तिने लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत .