औषध देण्याच्या बहाण्याने पेशंटसोबत झालेल्या मैत्रीचा मालवणला शेवट

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यात समोर आली असून एका पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार करून वेळोवेळी तिच्याकडून विविध कारणांसाठी म्हणून पैसे उकळून तब्बल अडीच लाख रुपयांना एका व्यक्तीने गंडा घातला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव परिसरात ही घटना घडलेली आहे. सदर प्रकरणी अरुण अण्णासाहेब पाटील ( वय 50 राहणार हातोंडी, तालुका हातकणंगले ) यांच्याविरोधात वडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

उपलब्ध माहितीनुसार, हातकणंगले तालुक्यातील भादुले येथे राहणारी पीडित महिला ही परिचारिका आहे. औषध देण्याच्या माध्यमातून पाटील याच्यासोबत तिची ओळख झाली होती. त्या ओळखीतून तो पुढे तिच्या घरी जाऊ लागला आणि त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवत मालवण येथे घेऊन जाऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले तसेच विविध कारणे दाखवत त्याने तिच्याकडून तब्बल अडीच लाख रुपये देखील उकळले असे पीडितेचे म्हणणे आहे .