पुण्यात खळबळ..आत्महत्या अपघात की घातपात ?

शेअर करा

पुणे शहरात एक धक्कादायक घटना उघडकीला आलेली असून जुन्या कात्रजच्या बोगदा परिसरातील दरीमध्ये गुरुवारी 14 तारखेला सकाळी एका युवकाचा दुचाकीसह झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलेला आहे. पोलीस आणि अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत त्याचा मृतदेह आणि दुचाकी बाहेर काढली आहे.

उपलब्ध माहितीनुसार अक्षय चव्हाण ( वय 22 राहणार रामटेकडी हडपसर ) असे मयत तरुणाचे नाव असून ही आत्महत्या अपघात की घातपात याचा भारती विद्यापीठ पोलीस शोध घेत आहेत.

अक्षय हा खाजगी कंपनीत नोकरी करत असून 10 एप्रिलला संध्याकाळी तो बाहेर पडला होता त्यावेळी त्याने मी परत येणार नाही असा मेसेज आई भाऊ आणि त्याच्या मित्रांना पाठवला होता आणि त्यांना काळजी घेण्यास देखील त्याने सांगितले होते. त्याने हे का केले याबाबत मात्र संभ्रम असून त्याचे कुणाशीही वैर नव्हते आणि दुचाकीसह तो इतक्या खोल दरीत कसा गेला हे प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत.

कात्रज घाट परिसरातील दरीमध्ये हा मृतदेह आढळल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. संपूर्ण मृतदेह जळालेल्या अवस्थेत होता आणि त्याच्या सोबत असलेली दुचाकी देखील जळालेली होती त्यामुळे त्याची ओळख पटेल असे काहीच दिसून येत नव्हते मात्र पोलिसांनी त्याच्या दुचाकीच्या चेसीनंबर वरून त्याचा शुक्रवार पेठेतील पत्ता शोधला आणि त्यानंतर त्याचे कुटुंबीय हडपसर येथे राहत असल्याची माहिती समजली. अक्षय याने चार दिवसांपूर्वीच घर सोडले होते आणि त्यानंतर त्याचा मृतदेह हाती आला आहे.


शेअर करा