काश्मीरमध्ये पुन्हा रक्तपात , आधी नाव विचारले अन नाव ऐकताच ..

काश्मीरमधील कलम ३७० काढून टाकले आणि नोटबंदी केली म्हणजे दहशतवाद संपेल असे दावे हे निर्णय घेण्याच्या वेळी करण्यात आले होते मात्र त्याचा कुठलाही परिणाम दिसून आलेला नसून काश्मीरमध्ये पुन्हा एकदा काश्मीर पंडित यांच्या हत्येनंतर खळबळ उडालेली आहे. शोपीयान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी दोन भावांवर सफरचंदाच्या बागेत जोरदार गोळीबार केला त्यात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झालेला आहे.

सुनीलकुमार भट्ट असे मयत व्यक्तीचे नाव आहे तर त्याचा लहान भाऊ पितांबर नाथ पंडित असे त्यांच्या भावाचे नाव आहे. सफरचंदाच्या बागेत दोघे काम करत असताना दहशतवादी तिथे आले आणि नावे विचारून त्यांच्यावर गोळीबार केला. सुनीलकुमार यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देऊ असे काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी म्हटलेले असून काश्मिरी पंडित पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे तर अनेक जणांनी काश्‍मीर सोडून इतरत्र जाण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे.